• 3 December 2023 (Sunday)
  • |
  • |


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, औरंगाबादेत जोरदार शक्तिप्रदर्शन


दौऱ्याला आजपासून नाशिकमधून सूरवात




शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे. नाशिकपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच या दौऱ्यात कुठले मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्लात मुख्यमंत्र्यांचा शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा दौराही त्याच पद्धतीने रेखाटण्यात आला आहे. मुख्यमंत्री सर्वप्रथम बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघात येणार आहे. तिथे रॅली करून मोठी सभा घेणार आहेत. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आगमन झाल्यावर प्रशासकीय बैठक ते घेणार मात्र त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील मतदार संघात जाणार आहे. तब्बल पाच तासांचा वेळ तिथे राखीव आहे, तिथे सभा घेणार रोड शो घेणार आहेत. त्यानंतर संभाजीनगरमध्ये येऊन आमदार संदीपान भुमरे यांचे कार्यालय,आमदार संजय शिरसाट यांचं कार्यालय, आमदार प्रदीप जयस्वाल यांचे कार्यालय इथेही भेट देणार आहेत.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान