• 3 December 2023 (Sunday)
  • |
  • |


जगातील टॉप-१० श्रीमंत लोकांच्या यादीतून अंबानी बाहेर


पाचव्या स्थानावरून अदानी आता सातव्या स्थानावर घसरले




काही दिवसांपूर्वी जगात टॉप-१० श्रीमंत यादी मध्ये दोन भारतीय होते मात्र आज एक मोठी बातमी समोर येत आहे. यावर्षी कमाईच्या बाबतीत जगातील अव्वल श्रीमंतांना मागे टाकणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहे. मागील काळापासून कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतलेल्या लोअर सर्किटमुळे त्याची मालमत्ता कमी झाली आहे. याचा परिणाम असा झाला की, टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत दीर्घकाळ पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर अदानी आता सातव्या स्थानावर घसरले आहेत. याशिवाय त्यांच्या दोन कंपन्यांचे मार्केट कॅपही खराब झाले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत आणि दीर्घकाळ टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर वर्चस्व गाजवणारे गौतम अदानी बुधवारी सहाव्या स्थानावर घसरले होते, तर शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ते आता या क्रमांकावर आहेत. ते या यादीत सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. अब्जाधीश निर्देशांकानुसार, गेल्या २४ तासांत त्यांची एकूण संपत्ती $५.८४ अब्ज डॉलरने कमी होऊन $१०२ अब्ज झाली आहे. त्यांच्या जागी लॅरी पेज आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी बऱ्याच काळापासून टॉप-१० च्या यादीत आपले स्थान घट्ट करुन होते. मात्र शुक्रवारी घसरणीमुळे मुकेश अंबानी आता या यादीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या संपत्तीत $१.८७ बिलियनची घट झाली आहे आणि या घसरणीमुळे अंबानींची एकूण संपत्ती $८७.७ बिलियनवर आली आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान