• 15 August 2022 (Monday)
  • |
  • |


नोकरीसाठी संधी ! इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ४८० पदांची भरती


अर्ज करण्याची प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली असून २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने अप्रेंटिस पदांकरिता भरतीसाठी अधिसूचना जाहीर केलीय. या अंतर्गत एकूण ४८०पदांची भरती केली जाणार आहे इच्छुक उमेदवार iocl.com वर अथवा IOCL च्या अधिकृत संकेतस्थाळावर देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली असून २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे. IOCL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तांत्रिक आणि नॉन टेक्निकल प्रशिक्षणार्थींची भरती दक्षिण भारतातील राज्यांमध्ये (तामिळनाडू, पाँडेचरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय. अर्ज भरण्यास प्रारंभ : १३ ऑगस्ट २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ ऑगस्ट २०२१ लेखी परीक्षा : १९ सप्टेंबर २०२१ कागदपत्र पडताळणी : २७ सप्टेंबर २०२१ लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल. तसेच, लेखी परीक्षा मल्टीपल चॉईस प्रश्नांसह घेतली जाईल. ज्यात एक योग्य पर्याय असलेले चार प्रश्न असतील, तर उमेदवार परीक्षेशी संबंधित तपशीलांसाठी च्या अधिकृत संकेतस्थाळाला भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज करणासाठी उमेदवारांना १८ ते २४ वर्षांचा अनुभव असावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार शिथिलता दिली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान