• 15 August 2022 (Monday)
  • |
  • |


दहावी पास विद्यार्थ्यांना नौदलात करियर करण्याची संधी ; या पदासाठी चालू आहे भरती


३३ सेलर पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास ३०० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही भरती ऑक्टोबर २०२१ च्या बॅचसाठी करण्यात येणार आहे.
भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्हीमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. फक्त दहावी पास अशी पात्रता सेलर या पदासाठी असून नौदलात करियर करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ‘सेलर’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आजपासून म्हणजे २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या दरम्यान अर्ज करावे. या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. भारतीय नौदलाच्या रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून ३३ सेलर पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास ३०० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही भरती ऑक्टोबर २०२१ च्या बॅचसाठी करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी केंद्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शाळेतून दहावी उत्तीर्ण असायला हवे. वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यानचा असावा. महत्वाचं म्हणजे या वयोमर्यादेत कोणत्याही प्रवर्गाला विशेष सवलत देण्यात आली नाही. शुल्क – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. निवड प्रक्रिया – अर्ज केलेल्या जवळपास ३०० उमेदवारांना म्यूजिक टेस्ट आणि पीएफटी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी उमेदवाराला शारीरिक चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. या उमेदवारांना सात मिनीटात १.६ किमीची धाव घ्यावी लागणार आहे. तसेच २० उठा-बशा आणि १० पुश-अप काढावे लागणार आहेत. वेतन – भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेनिंग प्रक्रियेच्या दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देण्यात येणार आहे. तो १४,६०० रुपये एवढा असणार आहे. त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना ३ डिफेन्स पे नुसार ( २१,७०० ते ६९,१००) रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्याचसोबत त्यांना डीए आणि ५२०० रुपये एमएसपी देण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान