Notice: Undefined index: page in /home/webdynam/saampatra.com/share/share_page_news.php on line 4
मोदींचा दे दणका! 
  • 7 October 2022 (Friday)
  • |
  • |

मोदींचा दे दणका!


आपण प्रत्येकवेळी चर्चेत राहु अशा प्रकारचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तासुत्र स्विकारल्यापासून अनेकदा घेतलेला आहे.पंतप्रधानपदाची शपथ घेतांना त्यांनी वेगळीच चुणूक दाखवली ती देखील चर्चेचा विषय ठरली. मोदींनी शपथविधीच्या सोहळयाला जगातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना पाचारण केले होते.एक वेगळीच छाप यानिमित्ताने पाडलेली होती. अफगाणिस्तानच्या दौNयावर असतांना तो दौरा आटोपून ते ध्यानी मनी नसतांना इस्लामाबादेत उतरले आणि तेथील पंतप्रधान नवाझ शरिफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून जगाला आश्चर्यचकित केले.त्यानंतर पाकिस्तानने आपले धोरण बदलले नाही. भारताविरुध्द खोडसाळ कारवाया सुरु ठेवल्या त्यानंतर पठाणकोटचा हल्ला झाला. आणि भारत पाकिस्तान मैत्री संशयाच्या भोवNयात आडकली. जम्मु काश्मिरातील ऊरी येथे लष्करी तळावर हल्ला झाला. या हल्यात १८ भारतीय जवान शहिद झाले. त्यामुळे भारतीय जनतेचा संताप अनावर झाला. यासर्व बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम लक्षात घेवून नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या हद्दीत सर्जीकल स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचा अड्डा उध्दवस्त केला. या सर्जीकल स्ट्राईकमुळे मोदी आंतरराष्ट़्रीय पातळीवर चमकले.त्यांचा दुसरा सर्जीकल स्ट्राईक म्हणजे ५०० रुपये व १००० रुपयाच्या नोटा रद्द करण्यास कारणिभुत ठरला. झटका एक दणका अनेकांना बसला आहे. संपुर्ण भारतात याची चर्चा सुरु आहे. सामान्य माणसांना आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांना यापाश्र्वभुमिवर प्रतिक्रीया देणे कठीण झाले.आता या निर्णयामुळे चांगले परिणाम किती दिसून येतील याचा अंदाज तुर्त घेता येणार नाही मात्र ध्यानी मनी नसतांना जबरदस्त दणका देण्यात मोदींनी मजल गाठली आहे.त्यांच्या या निर्णयामुळे लोक त्यांची तुलना इंदिरा गांधीशी करु लागले आहेत.यापुर्वीही माजी पंतप्रधान मोरारजी देसाई तसेच इंदिरा गांधी यांनीही अत्यंत धाडसी निर्णय घेतले.२ रुपये किलोंनी साखर देण्याचा मोरारजींचा निर्णय आजही जनतेच्या स्मरणात आहे.इंदिरा गांधीनी बँकेचे राष्ट्रीयकरण केले संस्थानिकाचे तनखे रद्द केले. त्यानंतर आज असचे धाडसी पाऊल मोदींनी उचलेले या निर्णयाचे सामाजीक परिणाम लगेचच दिसून येणार नाहीत मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाला जबरदस्त झटका बसला आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकांचा धामधुम सुरु आहे. तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी नगर परिषदांच्या निवडणूका सुरु आहेत. या निवडणूकीतील रणधुमाळीवर मोदींच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.एकुणच मोदींच्या या धाडसी निर्णयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटले आहे.प्रॉब्लेम ऑफ रुपी या गं्रथात बाबासाहेबांनी करन्सी वारंवार बदलण्याचे अर्थात प्रत्येक दहावर्षाला बदलण्याचे प्रतिपादन केलेले आहे.त्यांच्या या प्रतिपादनामागे सामाजिक व आर्थिक स्वास्थ मजबुत राहावे हाच उद्देश आहे. भ्रष्टाचार संपविण्याच्या दृष्टीने हा विचार महत्वाचा ठरलेला आहे. दुर्देवाने करन्सी बदलण्याचा धाडसी निर्णय आतापर्यंच्या काँग्रेसच्या सरकारने घेण्याचे टाळले यामागे राजकीय स्वार्थ असू शकतो परंतू मोदींनी कोणताच विचार न करता जनतेला दिलेले आश्वासन पुर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान