• 3 December 2023 (Sunday)
  • |
  • |


आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा, वाचा सविस्तर

राज्यात गेल्या महिन्याभरात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा...



राज्यात गेल्या महिन्याभरात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान या सर्व सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच २२ जुलैपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. या काळात ते औरंगाबादच्या विविध भागात जाऊन शिवसैनिकांशी सवांद साधणार आहे. तर औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजेरी लावणार आहे. येवला येथून एक तासाचा प्रवास करून आदित्य ठाकरे २२ जुलैला दुपारी २ वाजून ४५ मिनटाला वैजापूर येथे पोहचणार आहे. वैजापूर येथे शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यांनतर वैजापूर येथून औरंगाबाद असा दोन तासांचा प्रवास करून आदित्य ठाकरे संध्याकाळी ५ वाजता शहरात दाखल होणार आहे. त्यांनतर ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. दुसऱ्या दिवशी २३ जुलैला आदित्य ठाकरे हे सकाळी साडेदहा वाजता औरंगाबादहून पैठणच्या दिशीने जाणार आहे. पैठणमध्ये त्यांचे स्वागत केले जाणार. त्यांनतर पैठणहून गंगापूर आणि गंगापूरहून नेवासा असा आदित्य ठाकरेंचा प्रवास असणार आहे. दरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान