• 15 August 2022 (Monday)
  • |
  • |


ना. च. कांबळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

वाशिम दि ११ (अजय ढवळे):- राघववेळ या कादंबरीला १९९५ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकाशझोतात आलेले ना. च. कांबळे यांना यावर्षीच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते...वाशिम दि ११ (अजय ढवळे):- राघववेळ या कादंबरीला १९९५ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकाशझोतात आलेले ना. च. कांबळे यांना यावर्षीच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य विश्वात बहुमोल कामगिरी करणाऱ्या नामदेव चंद्रभान कांबळे यांचा जन्म वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन या गावात १ जानेवारी १९४८ ला अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेत ,सुरूवातीला वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून नौकरीला लागले. नोकरीदरम्यान उच्च शिक्षण घेत याच शाळेत शिक्षकपदारुन ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान पत्रकारिता, राजकारणातही त्यांनी मुसाफिरी केली. मात्र खऱ्या अर्थाने ते साहित्य विश्वातच रमणाम झाले. विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव्हते. येथेच त्यांना अकादमी पुरस्कार मिळाला आणि आता २५ वर्षांनी पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अन्य पुस्तकांची अनेक हस्तलिखिते त्यांच्याजवळ आहेत. ना.च.यांना आतापर्यंत राघववेळ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार,ह.ना. आपटे पारितोषिक , बा.सी. मर्ढेकर पारितोषिक, ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक तर 'उनसावली' साठी वि.स. खांडेकर पारितोषिक (१९९८) प्राप्त झाले आहेत. यासह विविध ''सांजरंग', 'मोराचे पाय', 'कृष्णार्पण' यासाठी विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या राघव वेळचा बंगाली अनुवाद- 'रघबेर दिनरात' (२००९) मध्ये प्रकाशित झाला आहे. यासोबतच राज्य पुरस्कार 'राघव वेळ'(१९९४) ,'ऊन सावली'(१९९६),वैयक्तिक पुरस्कार- संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार,मुंबई, सामाजिक एकता पुरस्कार, मुंबई, अण्णा भाऊ साठे पुरस्कार-महा.राज्य, मुंबई, समाज भूषण पुरस्कार, नांदेड, जीवन गौरव पुरस्कार, औरंगाबाद विद्यापीठ, रायटर्स रेसिडेेन्स फेलोशिप-'साहित्य अकादमी '(२००९) इत्यादी पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. शेतमजूराचा मुलगा ते पद्मश्री ना. च. कांबळे हा त्यांचा प्रवास वाशिमकरांसाठी भूषणावह व प्रेरणादायी आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान