• 7 October 2022 (Friday)
  • |
  • |


पुण्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता !

पुण्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात...पुण्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय. गेली दोन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ वातावरण होतं. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. आज दुपारनंतर शहरात मध्यम पावसाला सुरुवात झालीये. याच मध्यम स्वरुपाच्या पावसाचं रुपांतर मुसळधार पावसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे कोलहापुरच्या घाट क्षेत्रातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान