• 21 February 2024 (Wednesday)
  • |
  • |

डॉ. विजय चाटोरीकर

मोफत सल्ल्यासाठीराशिभविष्यमेष


आर्थिक प्राप्ती चांगली. लोककला-कारांना विशेष चांगला अनुभव येईल. महिला : उत्साही आनंदी रहाल. ब्युटी पार्लरला भेट द्याल. युवक : शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. प्रलोभनापासून दूर रहा. मनोबल चांगले.


वृषभ


खर्च अधिक होईल. घरातील जबाबदारी वाढेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. महिला : कामाचा कंटाळा येईल. धार्मिक वृत्ती बनेल. घरात वाद संभवतात. युवक : मनोबल कमी.करमणुकीत वेळ घालवाल.


मिथुन


मोठे आर्थिक लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी समजेल. महिला : स्वत: जवळील कौशल्याचा उपयोग होईल. कुटुंबात मनमानीपणा कराल. सायंकाळनंतर मूड बिघडेल. युवक : विद्याभ्यासात चुणूक दाखवाल. मित्रांचा सहवास लाभेल.


कर्क


राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकार वाढतील. मानसन्मान लाभेल. मोठे आर्थिक लाभ. महिला : घर-कुटुंब व करिअर दोन्हीकडे लक्ष राहील. पैसा उपलब्ध होईल. युवक : मनोबल चांगले. कौतुक होईल. बक्षीस मिळवाल.


सिंह


वरिष्ठांची मर्जी सांभाळा. पतीपत्नीमध्ये पारदर्शकता हवी. मानसन्मान लाभेल. महिला : धार्मिक कामासाठी खूप खर्च कराल. ब्युटी पार्लरला भेट द्याल. मनावरील दडपण कमी होईल. युवक : चांगली बातमी समजेल. वडिलांचा सल्ला उपयुक्त राहील.


कन्या


सर्दी-पडसे जाणवेल. कायदेशीर बाबी सांभाळा. महिला : थकवा येईल. मनोबल कमी राहील. युवक : आपले नैतिक आचरण चांगले ठेवा. एखादी भाग्यकारक घटना अनुभवाल.


तूळ


पती-पत्नीमध्ये सहकार्य राहील. लोकांकडून कौतुक होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. बुध्दि कौशल्याने कामे होतील. महिला : एखादी इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान लाभेल. एकाकीपणे काम करावे लागेल. युवक : मनोबल चांगले. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील.


वृश्चिक


कष्टाच्या मानाने लाभ कमी होईल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास ते महागात पडेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. महिला : कामाचा व्याप वाढेल. वाद टाळा. मित्र परिवारांचा सहवास लाभेल. धार्मिक कृत्यात लक्ष घालाल. युवक : मनोबल चांगले. संबंधितांशी सल्लामसलत करा.


धनु


मोठे आर्थिक लाभ संभवतात. खोटे दस्तऐवज करू नका. थोर व्यक्तींचा आदर करा. महिला : संततीचा सहवास लाभेल. धार्मिक कृत्यात लक्ष घालाल. कामात शिथिलता येईल. युवक : मूड गाणे गुणगुणण्याचा राहील. नैतिक आचरण चांगले ठेवा.


मकर


घरात दिलेली आश्वासने पाळाल. महत्त्वाची कामे कराल. महिला : थकवा जाणवेल. शारीरिक सौख्य संभवत नाही. अहंम्‌पणा राहील. कामात व्यस्त रहाल. युवक : मनोबल कमी राहील. विरंगुळा म्हणून छोटा प्रवास घडेल.


कुंभ


पत्रव्यवहार करा. गाठीभेटी घ्या. जवळचा प्रवास घडेल. दिवसभर कामासाठी खूप धावपळ होईल. महिला : पतीपत्नीत थोडे असामंजस्य राहील. भावंडे भेटतील. युवक : मनोबल चांगले. तुमच्याजवळील कौशल्याचा उपयोग करा.


मीन


कौटुंबिक खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल. बुध्दिचातुर्याने आर्थिक लाभ होईल. महिला : कुटुंबातील गरजा इ. कडे लक्ष द्याल. युवक : विपरीत घटनेतून फायदा संभवतो. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील.


आजचा शुभ दिवस मेष