0
धर्मप्रचारक होण्याआधी जमशेद हे प्रसिद्ध पॉप स्टार होते. इस्लामाबाद / त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती. पाकिस्तानचे पुर्वाश्रमीचे प्रसिद्ध पॉप स्टार आणि मौलवी जुनैद जमशेद यांचे पीके-६६१ या विमानाच्या अपघातात निधन झाले आहे. इस्लामाबाद जवळ हा अपघात झाला. ५२ वर्षीय जमशेद हे कामानिमित्त चितराल या ठिकाणी गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीदेखील होती. या विमानात एकूण ४८ जण होते. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेने या ४८ जणांची यादी दिली आहे. त्यात त्यांचा समावेश होता. हवेलियन या डोंगराळ भागात आल्यानंतर या विमानाला अपघात झाला. या वृत्ताला त्यांच्या भावाने देखील दुजोरा दिला आहे. जमशेद आणि त्यांची पत्नी आयेशा हे दहा दिवसांच्या दौऱ्यावर होते. Dग्त्ग्ज् झ्raंप्aन्aत्व्ar ण्दस ँaम्व् घ्ह एस्aत्त् एम्rााह धर्मप्रचारक होण्याआधी जमशेद हे प्रसिद्ध पॉप स्टार होते. त्यांचा दिल दिल पाकिस्तान या देशभक्तीवर गीतांच्या अल्बमने तेथील तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या या गाण्याला पाकिस्तानचे अनौपचारिक राष्ट्रगीत देखील म्हटले जाते. आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांनी आपले पुढील आयुष्य धर्मप्रचारासाठी समर्पित करणार असल्याचे जाहीर केले होते. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) पीके-६६१ विमान दुपारी ३.३० वाजता चितराल येथून इस्लामाबादकडे निघाले होते. या विमानामध्ये ४३ प्रवासी, दोन हवाई सुंदरी, तीन चालकांचा समावेश होता. विमानामध्ये ९ महिला प्रवास करत होत्या. इस्लामाबाद येथील बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान ४.४० वाजण्याच्या सुमारास पोहोचणार होते. मात्र ४.१५ मिनिटांनी या विमानाचा रडारशी होणारा संपर्क तुटला. विमानाचा रडारशी होणारा संपर्क तुटल्यानंतर विमानाच्या पायलटने वाहतून नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली होती, असे पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य