• 29 March 2024 (Friday)
  • |
  • |


२०१७ मध्ये मोबाईल विश्वात धमाका करणार हे ५ स्मार्टफोन


0




२०१७ तील स्मार्टफोन हे केवळ सॉफ्टवेअर बाबतीतच नाहीतर हार्डवेअर बाबतीतची दमदार आणि आधुनिक असणार आहे. येणा-या वर्षात अनेक दमदार स्मार्टफोनच्या यादीत अनेक स्मार्टफोन्स आहेत. २०१७ मध्ये मोबाईल विश्वात धमाका करणार हे ५ स्मार्टफोन मुंबई: मोबाईल इंडस्ट्रीसाठी २०१६ हे वर्ष खूपच धमाकेदार राहिल. यावर्षभरात अनेक दमदार स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले. आता सर्वांच्या नजरा २०१७ कडे लागल्या आहेत. टेक्नॉलॉजी इतकी फास्ट होत आहे की, २०१७ मध्ये आणखीन स्मार्ट स्मार्टफोन बाजारात येणार. २०१७ तील स्मार्टफोन हे केवळ सॉफ्टवेअर बाबतीतच नाहीतर हार्डवेअर बाबतीतची दमदार आणि आधुनिक असणार आहे. येणा-या वर्षात अनेक दमदार स्मार्टफोनच्या यादीत अनेक स्मार्टफोन्स आहेत. पुढच्या वर्षी अ‍ॅप्पल आयफोनचा १०वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने कंपनी आयफोन ८ हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की, ओलेड डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, मल्टी सेंसर कॅमेरा आणि एका मॉडलमध्ये बेजेल नसणारी स्क्रीन दिली जाणार आहे. असे मानले जात आहे की, हा आयफोन ८ स्मार्टफोन ऑक्टोबरपर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलक्सी एस ८ या स्मार्टफोनची सर्वांनामध्ये उत्सुकता वाढली आहे. गॅलक्सी एस ८ मध्ये बेजेल नसलेली स्क्रीन आणि त्यातच फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच यात ४के स्क्रीन आणि पर्सनल असिस्टेंट दिलं जाण्याचीही शक्यता आहे. या स्मार्टफोनकडून मोठी आशा केली जात आहे. हा केवळ एक स्मार्टफोन नसून यात कम्प्युटरचं कामही केलं जाणार आहे. हा स्मार्टफोन मायक्रोसॉफ्टचा आतापर्यंतचा सर्वात मोठी फ्लॅगशिप डिवाईस असलेला फोन असणार आहे. यात २१ मेगापिक्सलचा दमदार रिअर कॅमेरा आणि १८ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा दिला जाऊ शकतो. नोकिया, स्मार्टफोनच्या जगात पुन्हा दमदार एन्ट्री घेत आहे. नोकियाने त्यांच्या पुढच्या वर्षात येणा-या D१ण् या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. यात होम, पॉवर आणि वॉल्यूमसाठी कोणतही बटन नसणार. यासोबतच यात सॅमसंग एज ७ ची कर्व्ड स्क्रीन असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनचीही ग्राहक आतुरतेने वाट बघत आहेत. या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे या स्मार्टफोनला फोल्ड होणारी स्क्रीन आहे. हा स्मार्टफोन इतका फोल्ड होतो की, तो तुम्ही तुमच्या मनगटावर घड्य़ाळासारखा बांधूही शकता.


महत्वाच्या बातम्या



हवामान