शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेन्ड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा केला आहे
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेन्ड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात परिवारातीलच लोक उपस्थित होते.शार्दूल आणि मिलताली एकमेकांच्या प्रेमात अनेक वर्षांपासून होते. त्यांनतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज त्यांचा साखरपुडा दोन्ही बाजूकडील परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.या सोहळ्यात एकूण ७५ लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यात दोन्ही परिवारातील सदस्य आणि मित्रांचा समावेश होता. परिवारातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार शार्दुल आणि मिताली पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी लग्नबंधनात अडकणार आहेत. शार्दुल ठाकूरला सध्या बीसीसीआयकडून सुट्टी देण्यात आली आहे. शार्दुल हा टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत चार कसोटी सामने, १५ एकदिवसीय तर २४ टी- २० सामने खेळला आहे. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने मागील काही दिवसात लोअर ऑर्डरमध्ये आपल्या फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य