• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


८ वर्षाचा मुलीच्या आत्महत्यांचे गूढ उघड,आत्महत्या नसून जन्मदात्या बापानेच केला खून


पती-पत्नीदरम्यान वाद असल्याने ती नांदायला येत नव्हती. म्हणून दगडू पाचे यानेच आपल्या मुलीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाडमधील गोलटगाव येथे दोन दिवसांपूर्वी ८ वर्षाची दुसऱ्या इयत्तेत शिकत असणाऱ्यामुलीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली होती. या मुलीने आत्महत्या केल्याचे दाखवण्यात आले होते.तेव्हा मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे बापानेच हे कृत्य केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे ८ वर्षांच्या या मुलीचा अशा प्रकारे खून कोणी केला, याचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणी बापानेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मुलीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळफासाने खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पती-पत्नीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या वेळी दगडू पाचे याच्या घरात सदर ८वर्षीय मुलगी, तिची बहीण, आजी आणि बाप होता. पत्नी माहेरी गेलेली होती. पती-पत्नीदरम्यान वाद असल्याने ती नांदायला येत नव्हती. म्हणून दगडू पाचे यानेच आपल्या मुलीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. या गुन्ह्याची कबुली त्याने करमाड पोलिसांना दिली. आपल्याच मुलीची हत्या करणाऱ्या या क्रूर बापाला करमाड पोलिसांनी गजाआड केले आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान