• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


नोरा आणि जॅकलिन यांना कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून समन्स


नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे.
हिंदी चित्रपट श्रुष्टीतील प्रसिद्ध दोन अभिनेत्री नोरा फातेही आणि जॅकलिन फर्नांडिस याच्यावर मनीलोउंड्रीग मध्ये समावेश असल्याचा शक्यते मुळे ईडीने नोटीस बजावली आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा जबाब नोंदवायचा आहे.सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलिनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.


महत्वाच्या बातम्याहवामान