• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


दादागिरी ! मुंबई उपमहापौरांच्या पतीकडून 'महाराष्ट्र बंद' यशस्वी करण्यासाठी रिक्षाचालकास मारहाण


ठाण्यात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करुन, त्या बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.
लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ठाण्यात मात्र एक असा व्हिडीओ समोर येत आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. ठाण्यात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करुन, त्या बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. बंदमुळे टीएमटीची सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे लोकांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम रिक्षाचालक करत आहेत. बंद पुकारला असताना देखील रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याची घटना निर्दशनास आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे बघायला मिळाल आहे. केवळ रिक्षाच सुरु असल्यामुळे बंद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक देखील यावेळी आक्रमक झाले आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान