• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


टी-२० विश्वचषक ; पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी भारताचे 'हे' खेळाडू सज्ज


१७ ऑक्टोबरपासून दुबईमध्ये पार पडणार टी-२० विश्वचषक
१७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला जाणार आहे. या सामानावर सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. टी -२० विश्वचषक सामना २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. यावर्षी टी -२० विश्वचषक जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे. टी -२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम खूप चांगला आहे. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने पाकिस्तानला पाचही सामानात दारुण पराभव केला आहे. दोन्हीही संघ २ वर्षांनंतर भिडणार आहेत. या टी-२० विश्वचषकासाठी भारताने हे खेळाडू जाहीर केले. विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, वरुणचक्रवर्तीजसप्रीत बुमराहभुवनेश्वर कुमार` ह्या ११ खेळाडू टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान