• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


पुरोगामी महाराष्ट्रात संतापजनक घटना ; अघोरी प्रथेसाठी ७ वर्षाचा मुलाचा नरबळी


कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे.




महाराष्ट्राला संतांचे राज्य म्हणून ओळखले जाते. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला संबोधले जाते. मात्र अघोरी प्रथेमुळे कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण कऱण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आला.मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरव केशव केशरे असे त्या चिमुरड्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आरवचं घराबाहेरून अपहरण करण्यात आले. यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेलं होतं. यामुळे हा नरबळीचा शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.या घटनेचा अनिसकडून निषेध करण्यात येत आहे. पोलीस या घटनेसंबंधी अधिक तपास करत आहेत.

हवामान