• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


औरंगाबादकरांनो पोलिसांच्या मदतीसाठी १०० नाही तर डायल करा ११२


औरंगाबादच्या नागरिकांना आता ११२ क्रमांक डायल करून पोलिसांनी मदत मागता येईल.
आपण कुठेही वाईट परिस्थितीमध्ये असलो, अडचणीत असलो तर आपण पोलिसांना संपर्क करतो,त्यासाठी आपण १०० नंबर डायल करतो. मात्र आता औरंगाबाद शहरातील नागरिकांना ११२ हा हेल्पलाइन क्रमांक वापरावा लागणार आहे. ११२ नंबर डायल करताच नागरिकांना पाच मिनिटात पोलिसांची मदत मिळू शकेल. महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम अर्थात महाराष्ट्र आतत्कालीन प्रतिसाद यंत्रणे अंतर्गत ही मदत पुरवली जाईल. या नंबरवर कॉल केल्यावर पोलिसांना लोकेशन सुद्धा कळणार आहे.ज्यामुळे पुढील कारवाई ला गती मिळेल. यासाठी शहरातील१७ पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र चारचाकी आणि दुचाकी देण्यात आली आहे. १०० नंबरचे कॉल सुद्धा ११२ वर वळवले जाणार आहे. पोलिसांकडून पाच मिनटांचा आता मदत मिळणार आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्त यांची प्रतिक्रिया - औरंगाबाद शहरातील नागरिकांना आता ११२ या क्रमांकावर डायल करून मदत मागता येईल. हा क्रमांक डायल केल्यानंतर लवकरात लवकर पोलीस तुमच्यापर्यंत पोहचतील. तसेच या योजनेकरिता एक चारचाकी आणि एक दुचाकी प्रत्येक ठाण्याला देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मदतीला त्वरीत धावून जाता येईल. – डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद.


महत्वाच्या बातम्याहवामान