• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


सिद्धार्थ शुक्लाची आज होणार शोकसभा; चाहत्यांना घेता येणार सहभाग


६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही शोकसभा भरणार आहे. जूमवर फॅन्स यात सहभागी होऊ शकतील.
बिग बॉस १३ चे विजेता, छोट्या पडडायचे प्रसिध्द अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं २ सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी अजूनही त्याच्या चाहत्यांना पचवणं कठीण जात आहे. तसेच त्याच्या कुटुंबासाठी आणि निकटवर्तीयांसाठी हा मोठा धक्का आहे.२ सप्टेंबर रोजी मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. अगदी शोकाकुल वातावरणात त्याने शेवटचा निरोप घेतला. तर आता सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी त्याच्या शोक सभेचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांना ही यात सहभागी होता येणार आहे.६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही शोकसभा भरणार आहे. जूमवर फॅन्स यात सहभागी होऊ शकतील. यावेळी विशेष मिडीटेशन आणि प्रार्थना सत्र होईल. करण ने यासोबतच जूम लिंक देखील दिली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान