• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


कोरोना लस खरी आहे की खोटी कशी ओळखावी ; घ्या जाणून


केंद्र सरकारने राज्य सरकारला बाजारात उपलब्ध बनावट कोविड लस ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.




कोरोना काळात जगभरातील नागरीकांसाठी लस वरदान ठरली आहे. मात्र, त्यानंतर काही ठिकाणी बनावट कोरोना लस आढळल्याने सरकारसाठी चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना लसींच्या बनावट संदर्भात चिंता व्यक्त केली आहे, यामुळे लसीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्यांना दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत एस्ट्राझेनेका/ऑक्सफोर्डच्या कोविशील्ड लसीच्या डुप्लिकेट व्हर्जन आढळल्या आहेत.त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारला बाजारात उपलब्ध बनावट कोविड लस ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सध्या भारतीय बाजारात कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी तीन लस उपलब्ध आहेत. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड, भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि रशियन लस स्पुटनिक व्ही. कोविशिल्डची लस कशी ओळखाल - कुपीच्या बाटलीवर खालील तपशील असावेत, एसआयआय (SII) उत्पादन लेबल, ट्रेडमार्क असलेले ब्रँड नेम (Covishield) तिथे असावे, जेनेरिक नावाचा फॉन्ट अन-बोल्ड असेल, Recombinant समान फॉन्टमध्ये सामान्य नावाच्या खाली नमूद केले जाईल. CGS विक्रीसाठी नाही, लेबलच्या चिकट बाजूला SII लोगो असेल, लेबल कलर शेड गडद हिरवा आहे आणि अॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील गडद हिरवा आहे, या सर्व गोष्टी लसीवर आहे हे बघून लस घ्यावी.


महत्वाच्या बातम्या



हवामान