• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगार अंबाजोगाई पोलीस स्टेशन मधून पसार


समाधान वैरागे(३२) याने २०१६ मध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलीस तपासात आढळून आला होता.




काही वर्षापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेल्या दरोडेखोराने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बीडच्या अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. समाधान वैरागे(३२) याने २०१६ मध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलीस तपासात आढळून आला होता. समाधान हा मूळचा केज तालुक्यातील जवळबन मधला राहणारा आहे. पोलीस त्याचा अनेक दिवसापासून शोध घेत असतानाच. अशातच १ सप्टेंबर रोजी तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी समाधान वैरागे अखैर त्याला पकडले. त्याला वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडलेला आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने खळबळ उडाली आहे. समाधान वैरागे हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. समाधान पोलीस स्टेशनमधून पळून गेल्याची माहिती कळताच बीड जिल्ह्यातील पोलिस खडबडून जागे झालं आहे. दोन पथकाद्वारे समाधानचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. तो पोलिसांच्या सद्याही हाती लागलेला नाही.

हवामान