• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


मी सचिनपेक्षा सेहवागला घाबरायचो..


जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजानं दिली प्रतिक्रिया ‘‘२०११ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धोनी माझ्यामुळे युवराजच्या आधी आला''
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधरन म्हणाला, माझ्या कारकीर्दीत मी सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्यास कधीही घाबरत नव्हतो, परंतु वीरेंद्र सेहवागला जास्त घाबरत होतो, कारण तो कधीही फटकेबाजी करू शकत होता. ईएसपीएन क्रिकइन्फोवर आकाश चोप्रासोबत झालेल्या संभाषणात मुरलीधरनने आपले मत व्यक्त केले. मुरलीधरन म्हणाला, सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायला मी घाबरत नव्हतो, कारण त्याने माझे नुकसान केले नाही. दुसरीकडे, वीरेंद्र सेहवाग खूप धोकादायक खेळाडू होता. जेव्हा तो फलंदाजीला यायचा, तेव्हा आम्ही क्षेत्ररक्षक दूर ठेवायचो. कारण आम्हाला माहीत होते, की तो निश्चितपणे फटकेबाजी करणार आहे. सेहवागला माहीत होते, की जर त्याचा दिवस असेल तर तो जगातील कोणत्याही गोलंदाजावर हल्ला चढवूू शकतो. मुरलीधरनने सचिनच्या कमकुवत बाजूचाही खुलासा केला. तो म्हणाला, मला माझ्या कारकिर्दीत नेहमीच असे वाटत आले आहे, की सचिन तेंडुलकरला ऑफ स्पिन विरुद्ध थोडी अडचण होती. तो लेग स्पिनविरुद्ध खूप धावा करायचा, पण त्याला ऑफ स्पिनवर त्रास व्हायचा आणि मी त्याला ऑफ स्पिन खेळवताना अनेक वेळा बाद केले आहे. याआधी मुरलीधरनने २०११च्या वर्ल्डकप फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर का खेळला, याचे कारणही स्पष्ट केले. मुरलीधरन म्हणाला, धोनीने माझ्या गोलंदाजीचे आकलन केले होते. म्हणूनच तो अंतिम सामन्यात पाचव्या क्रमांकावर आला. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्जमध्ये होतो, तेव्हा शेवटी त्याला माझी गोलंदाजी कळली होती. युवराजला वर्ल्डकपमध्ये माझ्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तो येणार होता, पण मला वाटते की धोनी माझ्यामुळे त्याच्याआधी आला. विक्रमवीर मुरलीधरन कसोटी आणि एकदिवसीय दोन्हीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने वनडे क्रिकेटमध्ये ५३४ विकेट्सही घेतल्या आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान