• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


वडेट्टीवारांचा बाबा रामदेवांना टोला...!


औरंगाबाद येथे पार पडलेल्या ओसीबी समाजाच्या मेळाव्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे.
प्रतिनिधी/औरंगाबाद : औरंगाबाद येथे पार पडलेल्या ओसीबी समाजाच्या मेळाव्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. यामुळे ओबीसी समाजासह ओबीसी समाजाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही,अशी भूमिकाही अनेकांनी घेतली आहे.याचदरम्यान,मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रामदेव बाबांवर मोठ्याप्रमाणात टीका केली.ते म्हणाले की,'रामदेव बाबा हे जेवढ्या गाई नाहीत,त्यापेक्षा अधिक तूप विकत आहेत. तर जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहून अधिक मध विकत आहे. पण आपले तसे असून,जेवढ्या गाई आहेत, तेवढेच तूप निघते आणि तेवढेच तूप विकतो' अशा शब्दात वडेट्टीवार यांनी रामदेव बाबांवर टीका केली आहे. दरम्यान,यावेळी वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावरही टीका केली. केंद्र सरकारकडून इंपेरियल डेटा देण्यात येत नाही,असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली.


महत्वाच्या बातम्याहवामान