• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


भीती दाखवत ३० हजारांचे दागिने केले लंपास...!


शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी महिलेला चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करत ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
प्रतिनिधी/औरंगाबाद : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी महिलेला चाकूचा धाक दाखवत तसेच मारहाण करत ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे नजीकच्या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.आशाबाई दत्तू निगळ(वय ५०)असे या महिलेचे नाव असून त्या त्यांच्या विरगाव रोडवरील शेतात गुरुवारी(५ ऑगस्ट)मुगाच्या शेंगा तोडत होत्या.त्यावेळी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर दोघेजण आले. त्यातील एकाने आशाबाईकडे जाऊन गळ्यातील सोन्याचे दागिने काढून दे असे धमकावले. यामुळे घाबरलेल्या आशाबाईंनी दागिने काढून देण्यास होकार दिला.मात्र,तरीही त्याच वेळी दुसऱ्या तरुणाने त्यांना काठीने आणि मारहाण करत सोन्याचे दागिने हिसकावून तेथून लंपास झाले.त्यानंतर आशाबाईंचा आवाज ऐकून परिसरातील महिला घटनास्थळी आल्या आणि उपचारासाठी त्यांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हवामान