• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


एक खेड्यातील साधारण मुलगी ते ऑलिम्पिकमध्ये पदक विजेता लवलिनाचा थक्क करणारा प्रवास


तुर्कीच्या खेळाडूने लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जोरदार कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं पदक निश्चित झालं होतं
बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं रचला इतिहास. सेमिफायनलमध्ये तिचा पराभव झाला मात्र तिने देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या खेळाडूने लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जोरदार कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं पदक निश्चित झालं होतं. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिच्या संघर्षाची ही कहाणी. नीट रस्तेही नसणाऱ्या आसाममधील एका खेड्यातून सुरु झालेला लवलीनाचा हा प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचला. पदक जिंकल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय तिच्या घरापर्यंत पक्के रस्ते बनवले जात आहेत मात्र तिच्या संघर्षाची वाट खरोखर सोपी नव्हती. क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला ४-१ अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं जर्मनीच्या अनुभवी खेळाडूला पराभूत करत आपलं पदक निश्चित केलं होतं. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक मिळालं. ६९ किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. पहिलंच ऑलिम्पिक आणि पहिलंच मेडल खरोखर लवलीनासह सर्व भारतीयांना आनंद देणारी गोष्ट ठरली आहे.आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना तिच्या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला खेळाचा कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. लवलीनाला आवडणारे खेळाडू माइक टायसनची स्टाईल आवडते तर मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. मात्र आता तिनं या दोघांप्रमाणेच तिने ओळख बनवली. २०१८ मध्ये लवलीनाने दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकलं होत. लवलीना बॉरगोहेनचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली.


महत्वाच्या बातम्याहवामान