• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


सावधान ! ५जी नेटवर्कमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार ?


५ जी मुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची देखील शक्यता आहे. जाणून घेऊया ५जी मुळे काय परिणाम होतील.




जगभरासोबत भारताने सुद्धा नेक्सट जनरेशन नेटवर्क ५ जी वर काम सुरू आहे. सॅमसंगने ५ जी स्मार्ट फोन बाजारात आणले आहेत तर अनेक कंपन्या ५जी कनेक्टेड चारचाकी वाहने बाजारात आणत आहेत. चीनने देखील ५जी च्या व्यवसायिक वापरासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे चीनच्या टेलीकॉम क्षेत्रात क्रांती होणार आहे. ५जीच्या स्पीडबद्दल सांगण्यात येत आहे की, यामुळे मोठमोठ्या फाईल्स सहज डाऊनलोड करणे शक्य होतील. मात्र याचबरोबर ५जी मुळे आरोग्यावर होणाऱ्या चर्चांबद्दल देखील मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे. सांगण्यात येत आहे की, ५ जी मुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची देखील शक्यता आहे. जाणून घेऊया ५जी मुळे काय परिणाम होतील. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने ५जी मनुष्यासाठी घातक असल्याचे सांगितले आहे. ५ जी राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून, मनुष्याच्या आरोग्यावर देखील याचा प्रभाव पडेल.५ जीच्या रेडिएशनमुळे कॅन्सर, वांझपणा आणि अल्जाइमरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. असे असले तरी वैज्ञानिकांनी या दाव्याबाबत पुष्ठी केलेली नाही. परंतु दाव्याबाबत काही ठोस वैज्ञानिक पुरावे दिलेले नाहीत. मोबाईल फोनमध्ये उपयोग करण्यात येणाऱ्या विद्युत चुंबकिय विकिरणांबद्दल अनेक देशांमध्ये वेगवेगळी मते आहेत. अनेकांचा दावा आहे की, ५ जी मुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. वर्ष २०१४ मध्ये विश्व आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, मोबाईल फोनच्या नेटवर्कमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. मात्र संघटनेने इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरद्वारे सांगितले की, रेडिओ फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे कॅन्सर होऊ शकतो. मोबाईल सिग्नल हे रेडिओ फ्रिक्वेंसीवरच काम करतात. अनेक लोकांना माहिती आहे की, एक्सरे, एफएम रेडिओ आणि कंम्प्युटरमधून विकिरणे निघतात. ही विकिरणं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे आयोनाइजिंग आणि दुरसे म्हणजे नॉन आयोनाइजिंग. नॉन आयोनाजिंग विकिरण कमजोर असतात. ते मनुष्याच्या शरीरातील केमिकल बॉन्ड्स तोड्यास सक्षम नसतात. एफएम रेडिओ, एक्सरे, मोबाईल आणि वाय-फाय हे नॉन आयोनाइजिंगच्या श्रेणीमध्ये येतात. तर आयोनाइजिंग श्रेणीमध्ये एक्सरे येतात. जे आरोग्यासाठी घातक आहेत. यानुसार ५ जी आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. मात्र चोवीस तास ५ जी नेटवर्कच्या जवळ असणे धोकादायक ठरू शकते.

हवामान