• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


तुम्हाला गॅस सबसिडी मिळत नाही ? तर जाणून घ्या सविस्तर माहिती


तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता.
काही दिवसापासून देशात व राज्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सलग वाढत आहेत. एलपीजीचे दर उद्या म्हणजेच १ ऑगस्ट रोजी निश्चित केले जातील. त्यामुळे पुन्हा सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्वाची झाली आहे. जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता. कसा करावा गॅस सबसिडीसाठी अर्ज : १. प्रथम www.mylpg.in वर जा आणि आपला सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. २. आता एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल. येथे तुम्हाला साइन इन आणि नवीन वापरकर्ता (न्यू युझर) असे दोन पर्याय दिसतील. ३. जर तुम्ही आधी लॉग इन केले असेल तर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड माहित असेल. त्याद्वारे लॉग इन करा. जर तुम्ही यापूर्वी कधीही लॉग इन केले नसेल तर नवीन वापरकर्ता पर्याय निवडा. ४. आता एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल. यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History चा पर्याय निवडा. आता तुम्हाला किती सबसिडी मिळाली आणि केव्हा? याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल. ५. जर तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल, तर फीडबॅक बटणावर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवा. ६. जर तुम्ही अद्याप एलपीजी आयडी तुमच्या खात्याशी लिंक केले नसेल, तर तुम्ही वितरकाकडे (सर्व्हिस प्रोव्हायडर) जाऊन हे काम करून घ्या.याशिवाय 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तुम्ही तुमच्या सबसिडी सोडून देण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. याशिवाय आधार कार्ड लिंक नसले तरी सबसिडी बंद केली जाते. एलपीजीची सबसिडी सर्व राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना सबसिडीचा लाभ मिळत नाही, परंतु यापेक्षा कमी कमाई करणारे लोक अनुदानासाठी अर्ज करू शकतात.

हवामान