• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


संजय दत्त यांनी वाढदिवसानिमित्त 'केजीफ २' केले पोस्टर लॉन्च


डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ म्हणजेच संजय दत्त आज आपला ६२ वाढदिवस साजरा करत आहे. संजू बाबाने यानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी अनोख बक्षीस दिले आहे. ‘केजीएफ २’ या सुप्रसिद्ध चित्रपटात संजय दत्तच्या ‘अधीरा’ या भूमिकेबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त खूप भयानक रुपात दिसत आहे. संजय दत्त स्वीकारत असलेल्या ‘अधीरा’च्या लुकचे यापूर्वी सुद्धा अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. त्यानंतर संजय दत्तने आज हे नवे पोस्टर रिलीज केले आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर संजय दत्तने रिलीज केले आहे. या पोस्टरमधील संजय दत्तचा भयानक लुक पाहून ‘केजीएफ २’साठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. संजय दत्तने या पोस्टरमध्ये त्याच्या हातात तलवार पकडलेली दिसत असून त्याच्या मागे लोकांचा समुह दिसून येत आहे. संजय दत्तने हे पोस्टर शेअर करताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. तसेच ‘केजीएफ २’ मध्ये काम करतानाचा एक वेगळा अनुभव मिळाल्याचे देखील सांगितले आहे. ‘केजीएफ २’ १६ जुलै रोजी रिलीज करण्याचा निर्णय दिग्दर्शक प्रशांत नील यांनी घेतला होता. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान