• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० सामना ; आजच्या सामन्यातून 'हे' ९ खेळाडू वगळण्यात आले


कृणाल पांड्या च्या संपर्कात आल्यामुळे यांना विलगीकरणात ठेवले आहे.
आज बुधवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जाईल. हा सामना काल मंगळवारी २७ जुलै रोजी खेळवला जाणार होता, परंतु कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता ९ भारतीय खेळाडू या टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. हे खेळाडू आज खेळू शकणार नाही हे सर्वजण बाधित कृणाल पांड्या च्या संपर्कात आल्यामुळे यांना विलगीकरणात ठेवले आहे. शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, इशान किशन, सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत. दिलासादायक बातमी म्हणजे, कृणालच्या संपर्कात असलेल्या आठ लोकांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सूत्रांनुसार आज बुधवारी दोन्ही संघांच्या खेळाडूंची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. काही क्रिकेटपटू पूर्णपणे क्वारंटाइन आहेत आणि त्यांना मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळता येणार नाहीत. या परिस्थितीवर श्रीलंका क्रिकेट बोर्ड लक्ष ठेवून आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान