२९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सध्या राजला ऑर्थर रोड कारागृहात ठेवले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पे यांचा जामिन अर्ज बुधवारी मुंबईतील किला कोर्टाने फेटाळून लावला. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने पॉर्न फिल्म बनवणे आणि त्यांना अँप अपलोड केल्या प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे लक्ष आता उद्या, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या जामिन अर्जावर होणाऱ्या सुनावणीवरच आहे. राज कुंद्रा याची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर राजच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. राज आणि रायन यांच्या जामिन अर्जावर किला कोर्टात सुनावणी झाली असता त्यांचे अर्ज फेटाळून लावले आहे. राजने मुंबई उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आता उच्च न्यायालय अर्जावर काय सुनावणी देतं याकडे राजचे लक्ष लागले आहे. राज कुंद्राला झालेली अटक ही बेकायदा असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत त्याच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राजच्या या याचिकेवर गुरुवारी, २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सध्या राजला ऑर्थर रोड कारागृहात ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य