प्रतिनिधी/औरंगाबाद : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख हे औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्रीही आहेत.त्यांनी मंगळवारी(२७ जुलै)मुंबई येथे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेतली.बैठकीदरम्यान पक्षांतर्गत विषयांबरोबरच जिल्ह्यातील विविध विकास कामांचीही चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील पक्ष वाढीबरोबरच विविध विकास कामाच्या बाबतीतही सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांना अमित देशमुख यांनी यावेळी दिली.आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.या निवडणुकांची पक्षपातळीवर तयारी करावी, बूथ कमिट्या मजबूत कराव्यात, पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, तरुण कार्यकर्त्यांना पक्ष कार्यात सहभागी करून घेऊन त्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांची माहिती करून द्यावी.असेही ते म्हणाले.तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील अडचणी समजून घेतल्या,त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे तसेच मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी ना.देशमुख यांनी दिली. दरम्यान,बैठकीस औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, आ. राजेश राठोड, अनु.जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, अनिल सोनवणे, विनोद तांबे, भास्कर घायवट, अनिल श्रीखंडे, नगराध्यक्ष कमर भाई, संदिप बोरसे, अतिष पितळे, गौरव जैस्वाल, जयप्रकाश नारनवरे, कैसर आझाद यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य