• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


९५ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा...!


प्रतिनिधी/औरंगाबाद : सध्या सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे.कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी मोठ्याप्रमाणात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.मात्र,आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना आता लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे.लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्या नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे त्यांना मोबाईल वर सतत दुसरी लस घेण्यासाठी मेसेज येत आहेत.मात्र,लसीकरण केंद्रावरच लस उपलब्ध नसल्याने लस घ्यायची कुठून असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.तब्बल ९५ हजार नागरिक दुसरी लस मिळण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. दरम्यान,१६ जाने.पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी फ्रन्टलाइन वर्कर तसेच जेष्ठ नागरिक इत्यादींना लस देण्यात आली.

हवामान