८ ऑगस्ट २०२१ रोजी वूटवर होणार 'बिग बॉस १५'
नुकतीच बिग बॉस ओटीटीची घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉसची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर बिग बॉससंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यंदा बिग बॉस होस्ट करताना सलमान खान दिसणार नाही. त्याच्याजागेवर, निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा बिग बॉस शो होस्ट करणार आहे. करण जोहर सहा आठवडे सुरु राहणाऱ्या बिग बॉस ओटीटीचे अँकर असणार आहेत. बिग बॉस ओटीटीचं प्रिमियर ८ ऑगस्ट २०२१ रोजी वूटवर होणार आहे. यावर्षी बिग बॉसचे रूप वेगळे असणार आहे. कारण यंदा पहिल्यांदाच प्रेक्षक बिग बॉसच्या घरातील ड्रामा २४ तास कधी थेट पाहू शकणार आहेत. चाहते एक्स्ल्युझिव्ह कट्स, चोविस तासांच्या कंटेंट ड्राप्स आणि पूर्णपणे इंटरेक्टिव्ह सेशन पाहू शकणार आहेत. वूटवर डिजिटल प्रीमियर पूर्ण होण्यासोबतच बिग बॉस १५ लॉन्च होणार आहे. जे कलर्सवर ऑन एअर जाणार आहे.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य