• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


'टिकटॉक'चे होणार 'पुनरागमन'...?


प्रतिनिधी : जर तुम्ही टिकटॉक प्रेमी आहात तर हि बातमी खास तुमच्यासाठी.कारण,प्रसिद्ध चिनी व्हिडीओ शेअरिंग अॅप टिकटॉक लवकरच भारतात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.पबजी प्रमाणेच नवीन नाव आणि लूकसह टिकटॉक लॉन्च केले जाऊ शकते.टेक रिपोर्टनुसार,टिकटॉक हे अॅप तयार करणारी कंपनी 'बाईट डान्स' ने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंटस, डिजाइन अॅन्ड ट्रेड मार्कमध्ये अप्लाय केले आहे.
टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार,टिकटॉक चे स्वामित्तव असलेली कंपनी 'बाईट डान्स' द्वारे ६ जुलै रोजी फाईल करण्यात आलेल्या या नव्या ट्रेडमार्कमध्ये 'TikTok' ची स्पेलिंग बदलण्यात आली असून कंपनीने 'TickTock' या नावाने ट्रेडमार्कसाठी अॅप्लिकेशन दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बाईट डान्स आपले अॅप भारतात पुन्हा लॉन्च करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, ते नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व आयटी नियमांचे पालन करतील. दरम्यान,२०२० मध्ये केंद्र सरकारने ५६ चिनी अॅपवर बंदी घातली होती. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश होता.

हवामान