• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


मेट्रोमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी 'सुवर्णसंधी'...!


१.६० लाख रुपयांपर्यंत मिळणार पगार
दैनिक सामपत्र ऑनलाईन प्रतिनिधी/मुंबई : नोकरीच्या शोधात आहात? तर हि बातमी खास तुमच्यासाठी.मुंबई मेट्रोमध्ये आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती सुरु झाली असून या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनाकडून १७ जुलैपासून अर्ज मागवण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.जर तुम्हीही इच्छुक असाल तर २२ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.मेट्रोसाठीच्या या भरती अंतर्गत १९ जागा भरण्यात येणार असून 'उप अभियंता' तसेच 'ज्युनिअर अभियंता' या पदांसाठी विविध जागा भरण्यात येणार आहेत.जर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मुंबई मेट्रो रेलच्या अधिकृत संकेतस्थळावर करिअर सेक्शनमध्ये recruitment वर क्लिक करुन तुम्ही अधिक आणि सविस्तर माहिती मिळवू शकतात. दरम्यान,अर्जदाराने एआयसीटीई किंवा यूजीसीची मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठामधून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक पूर्ण केलेले असावे. पात्रतेनुसार ३५ हजारांपासून ते १ लाख ६० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.भरतीचा कालावधी ३ वर्षांचा असून यासंदर्भातील अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लीक करा.


महत्वाच्या बातम्याहवामान