• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


तरुणांसाठी मोठी संधी! इन्फोसिस आयटी कंपनी देणार ३५००० पदवीधरांना रोजगार


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे.
इन्फोसिस देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी. इन्फोसिसमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा आहे. अनेकांची ती इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. कारण इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जवळापास ३५००० कॉलेज ग्रॅज्युएट्सना (पदवीधर) नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे. डिजिटल क्षेत्रातील एक्सपर्ट्सची मागणी जसजशी वाढत गेली तसतसं काही काळानंतर हे इंडस्ट्रीसाठी एक आव्हान बनतं. प्रवीण राव पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही वित्तीय वर्ष २०२२ साठी ३५,००० महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. इन्फोसिसमध्ये कर्मचार्‍यांचा नोकरी सोडण्याचा दर जूनच्या तिमाहीत १३.९ टक्क्यांनी वाढला आहे. तर मार्चच्या तिमाहीत हा दर १०.९ टक्क्यांवर होता. इन्फोसिस ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. कंपनीने बुधवारी, १४ जुलै रोजी आपला जून तिमाहीचा रिपोर्ट जारी केला आहे. २०२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २२.७ टक्क्यांनी वाढून ५१९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४२३३ कोटी रुपये होता. तिमाही आधारावर मार्च २०२१ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा ५०७८ कोटी रुपये होता. कंपनीची एकत्रित कमाई वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढून २८,९८६ कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ही कमाई २३,६६५ कोटी रुपये होती. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी सलील पारेख यांनी म्हटलं की, कर्मचारी आणि क्लाईंट यांच्या आधारे जून २०२१ च्या तिमाहीत कंपनीची वाढ दहा वर्षात सर्वाधिक होती. कॉन्सेन्ट करन्सीवर वार्षिक आधारावर ही वाढ १६.९ टक्के आणि तिमाही आधारावर ४.८ टक्के आहे. त्यामुळे आम्ही रेवेन्यू ग्रोथ गाईडन्स १४ते १६ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान