• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


अजय देवगण आणि संजय दत्तचा 'हा'नवीन चित्रपट प्रेक्षकांचा भेटिला


१५ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ हा नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी डिझने हॉटस्टावर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत. १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेल्या एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. र्याहा चित्रपट १५ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शौवर आणखी चित्रपट बनवले जाणे आवश्यक आहे असे अजय देवगणे व्हर्च्युल पत्रकार परिषदेत सांगितले होते.


महत्वाच्या बातम्या



हवामान