• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना गोड भेट; पहा काय आहे ती भेट


रणवीर एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टिझर शेअर करत त्याने ही बातमी दिली.
अभिनेता रणवीर सिंग आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. पण वाढदिवशीच त्याने चाहत्यांना एक गोड भेट दिली आहे. रणवीर एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टिझर शेअर करत त्याने ही बातमी दिली. विशेष म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. २०१९ साली त्या दोघांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट आला होता जो प्रंचड लोकप्रिय झाला होता. याशिवाय त्यांची केमिस्ट्री ही सुपरहिट ठरली होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. नुकतच करण ने तो दिग्दर्शनात परतणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत टिझर ही प्रदर्शित करण्यात आला. रणवीरने सोशल मीडिया वर ही पोस्ट करत कॅप्शन लिहीत ही माहिती दिली. त्यामुळे रणवीर आलियाच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे. ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ असं या चित्रपटांचं नाव आहे. कऱम जोहर स्वतः हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान