• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


बडीशेप खाण्याचे फायदे


मुखशुद्धीसाठी बडीशेपचा सर्रास वापर होतो. पचनासाठी म्हणूनही बडीशेप खाल्ली जायची. त्याचे गुणधर्म पाहू.
रात्रभर पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी प्यावं. त्यामुळे लघवीचा दाह कमी होतो.  गोड, उष्ण, कफवातनाशक गुणधर्माची बडीशेप सुगंधी, रुचकर आहे. भोजनानंतर चिमूटभर बडीशेप तशीच किंवा विड्यात मिसळून खायची अनेक ठिकाणी पद्धत आहे. कोरडा खोकला किंवा तोंड आलं असेल तर बडीशेप चावून तोंडात धरावी. उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर त्याचा लेप लावावा. मासिक पाळीवेळी स्त्रियांना पोटदुखी होते. सकाळ, संध्याकाळ १-१ चमचा बडीशेप खाल्ल्याने ती थांबते. बडीशेप खाल्ल्याने पोटातील मुरडा कमी होतो.  लहान मुलांना पोटदुखी, पोटफुगी, पातळ शौचास होत असेल तर बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे. लहान मुलांना अजीर्ण, अपचनामुळे पोटात मुरडा मारतो. मुल रडू लागते. त्यावर ग्राईप वॉटर हे मुरडा थांबवणारे औषध द्यायची पद्धत आहे. यामध्ये बडीशेपचाअर्क असतो. एक चमचा बडीशेप पावडर, तेवढीच सुंठ पावडर गरम पाण्यासह रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शौचास चिकट आव पडायची थांबते. पचन सुधारते. बडीशेपपासून काढलेले तेल औषधात वापरतात. तापातून उठलेल्या पेशंटच्या तोंडाला चव नसणं, अन्नावरची वासना उडणंया तक्रारी असतात. त्यांना बडीशेप वरचे वर कोमट पाण्यासह खायला द्यावी. भूक लागते.

हवामान