• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे


रोज सकाळी तूप खाल्यास नर्व्हस सिस्टीमला उत्तेजन देण्याचे काम करते.
तुपाचे नियमित सेवन केल्यास केसांना मजबुती आणि चमकदार बनण्यासाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी तूप खाल्यास नर्व्हस सिस्टीमला उत्तेजन देण्याचे काम करते. जाणून घेऊया इतर फायदे... ्न लहान मुलांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी तूप आरोग्यवर्धक मानले आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळेच संधिवातामध्ये तुपाचे सेवन फायदेशीर ठरते. ्न तुपाचे नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारून त्वचा चमकदार बनते. ्न त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यास मदत मिळते. चेहरा टवटवीत / फ्रेश दिसतो. चेहऱ्यावरील येणारे फोड किंवा मुरूम यामुळे नाहीसे होतात. चेहऱ्यावर झालेले डाग किंवा खोलगट भाग तुपाच्या नियमित सेवनाने नाहीसे होतात. म्हशीच्या तुपापेक्षा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप आरोग्यास खूप लाभदायक ठरते. ्न सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. ्न केसगळतीचा त्रास कमी होतो. केस मजबूत आणि घनदाट होतात.

हवामान