• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


दोन अंध शिक्षकांकडून अंध मुलीवर बलात्कार


दोन अंध शिक्षकांकडून अंध मुलीवर बलात्कार
पालनपूर: दोन अंध शिक्षकांनी १५ वर्षीय अंध विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पालनपूर येथे उघडकीस आली आहे. नराधमांपैकी एका शिक्षकाचे वय ६२ वर्ष आहे. पीडित मुलीवर गेल्या चार महिन्यात या दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त पीडित विद्यार्थीनी पाटणा जिल्ह्यातील प्रेमनगर या तिच्या मूळ गावी नातेवाईकांकडे सुटीसाठी गेली असता तिने संपूर्ण प्रकार तिच्या काकीला सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. आरोपी शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणातील प्राथमिक शाळेत ८ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थीनीला पालनपूर येथे अंध विद्यार्थ्यांसाठी एका खासगी ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शाळेत दाखल करण्यात आलं होतं. अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शाळा चालवली जाते. यात पीडित विद्यार्थीनीने जुलै महिन्यात संगिताचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. पीडित विद्यार्थीनी दिवाळीच्या सुटीसाठी आपल्या मूळ गावच्या घरी परतली होती. पण सुटीनंतर तिने शाळेत जाण्यास नकार दिल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर पीडितेने कुटुंबियांना आपबिती सांगितली. शाळेतील चमन ठाकोर(६२) आणि जयंती ठाकोर (३०) या दोन शिक्षकांकडून अत्याचार झाल्याचं तिनं सांगितलं. पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी जयंती ठाकोर याने पीडितेवर शाळेच्या 'म्युझिक रुम'मध्ये बलात्कार केला. त्यानंतर तीन दिवसांनी चमन ठाकोर याने त्याच वर्गात पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. पुढे नवरात्री उत्सवाच्या अगोदरही जयंती ठाकोर याने पीडितेवर अतिप्रसंग केला होता.

हवामान