मुंबई-पुण्याच्या तापमानात तीन अंशांची घट दिवाळी पावसात गेली असली तरी आता राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यभरामधील कमाल आणि किमान तापमानात घट होत चालली आहे. पुढील काही दिवसांत गुलाबी थंडीचा...
मुंबई-पुण्याच्या तापमानात तीन अंशांची घट दिवाळी पावसात गेली असली तरी आता राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यभरामधील कमाल आणि किमान तापमानात घट होत चालली आहे. पुढील काही दिवसांत गुलाबी थंडीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई आणि पुणे शहरांच्या तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली. कोरडे झालेले हवामान आणि उत्तरेकडून सुरू झालेले वारे यामुळे तापमानात घट होऊ लागली आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसवरून ३३ अंश सेल्सियसवर तर किमान तापमानात २१ अंश सेल्सियसवरून २० वर उतरले. मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटे काही प्रमाणात धुकेही दाटू लागले आहे. पुणे शहराचे कमाल तापमान २९.६ अंश सेल्सियसवरून रविवारी २१.६ अंश सेल्सियसवर तर किमान तापमान १३.७ अंश सेल्सियसवरून ११.५ अंश सेल्सियसवर घसरले. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांमध्ये विदर्भासह राज्यातील अनेक भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये घट झाली आहे. उर्वरीत भागांतही लक्षणीय घट होत आहे. कोकण-गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.राज्यातील किमान तापमान (अंश सेल्सियसमध्ये) मुंबई (२०), अलिबाग (२१.४), रत्नागिरी (२१.५), पणजी (२१), डहाणू (२०.७), पुणे (११.५), अहमदनगर-जळगाव (१३.७), कोल्हापूर (१७.५), महाबळेश्वर (१३.८), मालेगाव (१५.२), नाशिक (१२.६), सांगली (१५.६), सातारा (१४.७). परभणी (१२.६), नांदेड (१५.५), बीड-अकोला (१४.५), चंद्रपूर (१६), गोंदिया (१४.४), यवतमाळ (१२). स्वेटर बाहेर.. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमधील नागरिक शनिवारी रात्रीपासूनच स्वेटरवर बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. मुंबई आणि पुण्यामधील बाजारांमध्ये स्वेटर खरेदीला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य