• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


औरंगाबाद शहरातील मोठ्या उद्दोजक आणि व्यावसायिकांवर ईडीची धाड

औरंगाबाद शहरातील उद्योजक, व्यावसायिक देखील ईडीच्या निशाण्यावर. आज दुपारी बारा वाजल्यापासून दोन मोठ्या व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. बिल्डर आणि बियाणे कंपनीशी संबंधित या मोठे व्यक्ती आहेत....औरंगाबाद शहरातील उद्योजक, व्यावसायिक देखील ईडीच्या निशाण्यावर. आज दुपारी बारा वाजल्यापासून दोन मोठ्या व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. बिल्डर आणि बियाणे कंपनीशी संबंधित या मोठे व्यक्ती आहेत. अद्यापही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत. औरंगाबाद शहरातील अदालत रोड वरील कार्यालयात आणि नक्षत्रवाडी परिसरातील कार्यालयात आणि कंपनी व घरी हे छापे टाकण्यात आले आहेत. या दोन उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये हिशेब नसलेली संपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडी कडून संपूर्ण माहिती गुपित ठेवली जात आहे. ईडी कडून आणखी काही अधिकृत माहिती मिळाली नाही.


महत्वाच्या बातम्याहवामान