• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


औरंगाबाद ! कोजागिरी पौर्णिमा निमित्त ५ लाख लिटर अतिरिक्त दुधाची मागणी

आज संपूर्ण राज्यात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. पौर्णिमाला लागणारे दुधाची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. शहरातील मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते; तसेच केटरिंग व्यावसायिक दूध बाजारातून खरेदी करतात. कोरोनाच्या...आज संपूर्ण राज्यात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. पौर्णिमाला लागणारे दुधाची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. शहरातील मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते; तसेच केटरिंग व्यावसायिक दूध बाजारातून खरेदी करतात. कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा कोजगिरी साजरी करता येणे शक्य आहे. परिणामी दुधाला मागणी वाढली आहे. जिल्हा दूध संघांकडून नियमित दीड लाख लीटरचा पुरवठा केला जातो. कोजागिरीच्या पार्श्वभूमिवर बाहेरील जिल्हयांमधून दूधाची मागणी असल्याने दूध संघांकडून अतिरिक्त दोन लाख लीटर दूधाचा पुरवठा केला जाणार आहे. मागणीनुसार दूधाचा पुरवठा केला जाणार आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान