• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट

देगलूर/प्रतिनिधी : मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्हात पाऊसाने थैमान घातले असुन, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या लहरी पाऊसाने हिरावून घेतला असून अतोनात नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून पाऊस असल्यामुळे...देगलूर/प्रतिनिधी : मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्हात पाऊसाने थैमान घातले असुन, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या लहरी पाऊसाने हिरावून घेतला असून अतोनात नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून पाऊस असल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यास हेक्टरी ८० हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या अशी मागणी भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष ईश्वर देशमुख यांनी केले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीद, सोयाबीन, कापुस, तुर व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे उडिद सोयाबीन भिजुन त्याला कोंब फुटत आहेत. अशातच अनेक शेतकऱ्यांचे उडीद कापुन गोळा करून ढिग ठेवले होते. त्याच्या खालुन पाऊसाचे पाणी जाऊन त्यांचे पण मोठं नुकसान झाले आहे. सतत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे विमा उतरवित आहे. जेणेकरून अशा लहरी संकटामुळे त्यांना पिक विमा मिळुन मदत होईल. या आशेने विमा भरत आहेत परंतु पिक विम्याच्या जाचक‌ अटीमुळे तीन ते चार वर्षांपासून नुकसान होऊन देखील शेतकरयांना विमा मिळत नसुन या विषयावर कोणी आवाज उठवला तयार नाही. त्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विमा मिळेल अशी शेतकरी आशा पोटी जगत आहेत. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पिकविमा कंपनीला आगाऊ 25% रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची सुचनाही केली आहे. परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे खुपचं जास्त नुकसान असल्यामुळे त्यांना भरीव पिक विमा मिळवून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे हि पण मागणी केली आहे. अनेक गावातील नदी नाले या अतिवृष्टीच्या पाऊसामुळे भरुन वाहत असुन नदी नाले काठच्या जमिनीत पाणी घुसून जमिनी खरडुन‌ वाहुन गेली आहे. अशा अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने शेतकरयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदत केली पाहिजे अशीही मागणी केली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान