• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


बैल पोळ्याचे औचित्य साधून 'त्या' चिमुकल्या मुलींना युवा नेते अनंता काळे यांनी दिला मदतीचा हात

वाशिम दि.०६:- (अजय ढवळे) मंगरूळपीर शहरातील वरुड रोडवरील असलेल्या अशोकनगर येथील डाके कुटुंबियातील त्या दोन चिमुकल्या मुलींचे पितृछञ हरवल्यानंतर आईही टाकुन गेली अशा अवस्थेत एकट्या असलेल्या आजीने काबाडकष्ट करुन त्या दोन चिमुकल्यांना...वाशिम दि.०६:- (अजय ढवळे) मंगरूळपीर शहरातील वरुड रोडवरील असलेल्या अशोकनगर येथील डाके कुटुंबियातील त्या दोन चिमुकल्या मुलींचे पितृछञ हरवल्यानंतर आईही टाकुन गेली अशा अवस्थेत एकट्या असलेल्या आजीने काबाडकष्ट करुन त्या दोन चिमुकल्यांना सांभाळण्याची जबाबदारी ऊचलली,हलाकीच्या परिस्थीतीमुळे हतबल झालेल्या या दोन मुलींना सामाजीक दायित्व जोपासुन सेवाभावींनी मदतीचे हात देवुन जगण्याचे नव बळ द्यावे असे आवाहन वृत्तपञ आणी सोशल मिडियाव्दारे पञकार तसेच सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी करताच या बाबीची दखल घेत राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते अनंता काळे यांनी त्या कुटुंबियांची भेट घेवून मुलींना कपडे तर त्या मुलींच्या आजीला साडीचोळीची दिली आणी मुलींच्या बारावीपर्यतच्या शिक्षणाची सोय लावुन देण्याचा शब्दही दिला. समाजकारणातुन राजकारण अशी भुमिका घेत नेहमी सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणारे राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनंता काळे यांनी मंगरुळपीर येथील अशोकनगर येथे जावुन डाके कुटुंबियांची भेट घेतली.तृप्ती आणी गुंजण या चिमुकल्या मुलींची आस्थेने विचारपुस करुन त्यांना कपडे, फ्राक भेट दिले.मुलगा मृत्युमुखी पडुन सुनही सोडुन गेली अशा अवस्थेत खंबिरपणे एकट्या असलेल्या मंगला डाके त्या चिमुकल्या नातींचा सांभाळ करत आहेत हे अभिमानास्पद आहे त्यामुळे अनंता काळे यांनी आमचा राष्टवादी काॅग्रेस पक्ष आणि सर्व पदाधिकारी तुमच्यासोबत सदैव राहू,कधिही अडिअडचणीत हाक मारा आम्ही नेहमी तुमची मदत करु असा त्यांना धिर देत त्या चिमुकल्या मुलींच्या आजिला साडिचोळीची भेट दिली.या जगात खुप दानशुर आणी सेवाभावी लोक असल्याचे मंगरुळपीर येथील अशोकनगरच्या त्या चिमुकल्या मुलींना होत असलेल्या मदतीबद्दल प्रत्यय येत आहे.काही दिवसापुर्वी दोन चिमूकल्या मुलींना मदतिचा हात हवा असल्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी सोशल मीडियातुन आणी वृत्तपञातुन केले होते त्यानंतर वृत्तपञांनीही दखल घेवूनसेवाभाविंनी वडिलांचे छञ आणी आईचीही माया नसलेल्या अशोकनगर वस्तीतील त्या मुलींना मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनानंतर काही सेवाभावींनी मदतही केली.चिमुकल्या मुलींना मदतीची गरज असल्याचे कळताच राष्टवादी युवक काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनंता काळे हे मंगरूळपीरला त्या कुटुंबियांना मदत देन्यासाठी पोहचले.तसेच आपले पक्षश्रेष्ठीसोबत त्या कुटुंबियांची भेट घेण्याविषयी चर्चा केली.लगेच पक्षांनीही हाकेला ओ देत येणार्‍या १४ तारखेला पक्षाचे वरिष्ठ मान्यवर डाके कुटुंबियांच्या भेटीसाठी येणार असुन गुंजण आणी तृप्ती या दोन निराधार मुलींच्या बारावीपर्यतच्या शिक्षणाचा सर्व भार ऊचलणार असल्याची माहीती अनंता काळे यांनी यावेळी दिली.सर्व पक्षवाल्यांनीही या चिमुकल्या मुलींना मदत करण्यासाठी पुढाकार घेवून प्रत्यक्ष मदत करावी असे आवाहनही केले.यावेळी इरफान शेख,फुलचंद भगत यांचीही ऊपस्थीती होती.या डाके कुटुंबियांना मायेने आधार देवुन सेवाभावींनी तसेच सर्वपक्षिय व राजकारण्यांनीही सढळ हातांनी अशोकनगरच्या त्या डाके कुटुंबीयांची मदत करावी असे आवाहनही यावेळी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले.


महत्वाच्या बातम्याहवामान