• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


जनगणनेसह आरक्षणाची मर्यादा निघेपर्यंत ओबीसींना आरक्षण अशक्य

वाशीम :दि.6 ( जिल्हा प्रतिनिधी) ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करुन ओबीसींच्या आरक्षणाची सुप्रिम कोर्टाने घालून दिलेली आणि घटनाबाहय असलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा काढल्याशिवाय समस्त ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणातील ...वाशीम :दि.6 ( जिल्हा प्रतिनिधी) ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करुन ओबीसींच्या आरक्षणाची सुप्रिम कोर्टाने घालून दिलेली आणि घटनाबाहय असलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा काढल्याशिवाय समस्त ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणातील आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय पिछडा वर्ग ( ओबीसी ) मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक प्रा. डि. आर. ओहोळ यांनी केले. स्थानिक स्वागत लॉन येथे दि. 5 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग ( ओबीसी ) मोर्चाच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ओबीसींमध्ये जाणीव जागृती व प्रबोधन अभियानांतर्गत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे ऊद्घाटन अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ऍड. किरणराव सरनाईक ह्यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या हक्कांसाठी ओबीसींनी संघटनात्मक संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी विचारपीठावर जेष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. रवी जाधव, माजी जि. प. सदस्य राजूभाऊ चौधरी, ओबीसी प्रवर्गाचे अभ्यासक विकास गवळी, ओबीसी मोर्चाचे राज्य प्रभारी विनोद इंगळे, तुकारामजी वाशीमकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे, अ. भा. सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे राज्य उपाध्यक्ष गोविंद रंगभाळ , माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे, बाजार समितीचे संचालक अनिल गोटे मानदार , सामाजिक कार्यकर्ते अनिल गवळी, सामाजिक कार्यकर्ते गजानन भोयर, भावसार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र जवादे, माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा किरणताई गिर्हे, जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, विश्वकर्मा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश गव्हाणकर , सय्यद रहेबर, लोणारी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत खांडेकर, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चिल्लोरे, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव सुरेकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक चुंबळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना प्रा.डी.आर.ओहोळ यांनी ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी ह्यांच्या नेतृत्वात देशभरात ओबीसी मध्ये जाणीव, जागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. देशातओबीसींच्या ३७४३ जाती तर महाराष्ट्रात ३३२ आणि वाशीम जिल्ह्यात ५७ जाती आढळतात. ह्यापैकी कुणबी, माळी, तेलीसह या प्रवर्गातील १७ जातींपर्यंत जिल्ह्यातील कार्यकर्ते पोहोचल्याने या मंडळीचा प्रामुख्याने प्रशिक्षण शिबिरात सहभाग असल्याचे ते म्हणाले. या प्रशिक्षणात सद्यस्थितीत कळीचा मुद्दा बनलेला ओबीसी आरक्षण हा विषय चर्चेत राहिला. स्वातंत्र्योत्तर काळात बहुविध सत्ताधारींनी ओबीसींची जनगणनेच्या मूद्द्याला बगल देण्यासाठी नानाविध बाबी समोर आणून ओबीसींच्या जनगणनेला मुद्दाम बगल देण्याचे कटकारस्थान कसे रचले ह्याची पोलखोल त्यांनी केली. ओबीसींनो आपली जातवार जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना लोकसंख्यांच्या प्रमाणात आरक्षण कसे मिळणार ? जर याप्रमाणात आरक्षणच् नाही तर तेवढा ओबीसी आरक्षित कोटा कसा येणार आणि जर कोटाच नाही तर राखीव जागा आणि विकासनिधी कसा मिळणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून ओबीसींच्या डोळ्यांवरची झापड ऊडविली. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा आधार घेत कँडरबेस लोक खरं बोलणारे असावे, नुसत् बरं!बरं!! करणारे नसावेत असा ईशारा दिला. तर्कसंगत विचार करावा आणि आता ओबीसींनी ओबीसींची जनगणना होण्यासाठी जनआंदोलन ऊभारावे असे आवाहन केले. जनगणने बाबत बोलतांना त्यांनी संसदेत असलेल्यापैकी दोनशे खासदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांनी एकजुटीने जनगणनेच्या विषयावर संसद बंद पाडली तर ओबीसी जनगणना मार्गी लागू शकते असे सांगितले. आरक्षणाबाबत बोलतांना त्यांनी संविधानापुर्वी संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे उदाहरण देवून आरक्षणाचे महत्त्व विशद केले. आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरुन शंभर टक्क्यांवर न्यावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या प्रवर्गाला आरक्षण बहाल करावे असे सांगितले. ओबीसीच्या अधोगतीची कारणे देतांना त्यांनी जातीव्यवस्थेची उतरंड समजावून सांगितली. आणि या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्या दृष्टीने शूद्र म्हणजेच ओबीसींवर कसा अन्याय केला याबाबत उदाहरणे दिली. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेले पाचही पक्ष म्हणजेच काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांवर ब्राह्मणांचीच पकड असल्याचे सांगून देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी ओबीसींना न्याय मिळणे अश्यक्य असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ओबीसींना आपले हक्क अधिकार मिळण्यासाठी जनआंदोलन हाच एकमेव पर्याय निवडुन त्यादृष्टीने समस्त ओबीसींनी एकजूट व्हावे असे आवाहन प्रा. ओहोळ यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवी जाधव यांनी तर बहारदार सुत्रसंचालन गजानन धामणे यांनी केले. उपस्थीतांचे आभार ओबीसी मोर्चाचे मुख्य संयोजक ईंजि. सिताराम वाशिमकर यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शंकर वानखेडे , सचिन खोटे, संदीप चिखलकर, भागवत मोहिरे, प्रशांत देशमुख, प्रवीण अवताडे, शिवशंकर कव्हर, अजय इंगोले, शिरीष इंगोले, शेख इसाक, अशोक कदम, सीताराम भोयर, रवी भांदुर्गे, प्रभाकर लहाने, संतोष आसोले, मदन जाधव, संभाजी साळसुंदर, गजानन राऊत, प्रकाश कुटे, नारायण पडघान, मुरलीधर जाधव, सुनिल जाधव, दिनकरराव बोडखे, सुदाम सुरजूसे, भागवत मापारी, गजानन हुले आदींसह अनेक ओबीसी बांधवांनी परिश्रम घेतले. या शिबिराला शेकडो ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. फोटो कॅपशन - 1) मार्गदर्शन करतांना प्रा. डि. आर. ओहोळ 2) शिबिरास उपस्थित ओबीसी बांधव


महत्वाच्या बातम्याहवामान