• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


तांत्रिक अडचणीमुळे परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुनःर्परीक्षेची संधी देण्याची मागणी

अनेक विद्यार्थ्यांना पुरेश्या नेटवर्क च्या अभावामुळे,अतिवृष्टीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने,परीक्षा देताना लॉगईन न झाल्याने,अचानक साईट लॉगआउट झाल्याने परीक्षेला मूकावे लागले आहे त्यामुळे अश्या विद्यार्थ्यांना...अनेक विद्यार्थ्यांना पुरेश्या नेटवर्क च्या अभावामुळे,अतिवृष्टीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने,परीक्षा देताना लॉगईन न झाल्याने,अचानक साईट लॉगआउट झाल्याने परीक्षेला मूकावे लागले आहे त्यामुळे अश्या विद्यार्थ्यांना पुनःर्परीक्षेची संधी देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.योगेश पाटील ह्यांची भेट घेऊन करण्यात आली चर्चेदरम्यान डॉ.पाटील ह्यांनी एकही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना पुनःर्परीक्षेची संधी देण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.विद्यापीठ परिक्षेत्राबाहेरील राज्यभरातील हजारो विद्यार्थी आपल्या विद्यापीठातील विविध विद्या शाखेत शिकत आहेत सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने अनेक विद्यार्थी आहे त्या ठिकाणावरून परीक्षा देत आहेत अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे,घरात पाणी शिरणे ह्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याच्या घटना घडत असल्याने ह्याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत परिणामी आर्थिक स्थिती खालावल्याने परीक्षेची पुन्हा फिस भरणे नव्याने परिक्षा देणे ह्याचा नाहक ताण विद्यार्थ्यांवर येणार आहे ह्याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. ह्यावेळी रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,अ‍ॅड.अतुल कांबळे,पँथर्स रिपब्लिकन चे गुणरत्न सोनवणे,विकास रोडे,सम्यक सरपे,अ‍ॅड.तुषार अवचार,प्रा.प्रबोधन बनसोडे,इंजि.अविनाश कांबळे,सचिन जमधडे,प्रवीण हिवराळ,गुरू कांबळे,सागर ठाकूर,कुणाल भालेराव,सागर प्रधान,सतीश शिंदे आदि उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्याहवामान