• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


मरखेल व हाणेगाव परिसरातील शेतकरी व तरूणांचा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश

देगलूर/प्रतिनिधी : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व निराधारांचे आधार वंदनीय, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याचा आदर्श घेत, जिल्हा प्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व देगलूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आहोरात्र झटणार्या...देगलूर/प्रतिनिधी : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व निराधारांचे आधार वंदनीय, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याचा आदर्श घेत, जिल्हा प्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व देगलूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आहोरात्र झटणार्या कैलास येसगे कावळगावकर (तालुका प्रमुख-प्रहार जनशक्ती पक्ष, देगलूर) यांच्या कार्याने प्रभावित होऊन शेकडो शेतकरी व तरूण प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. काल तालुका उपप्रमुख दिपक रेड्डी मरतोळीकर, हाणेगाव सर्कल प्रमुख संदिप चलवे, सादिक आत्तार, करडखेड सर्कल प्रमुख शहाजी पाटील बाबरे, वाहन चालक संघटना प्रमुख शिवप्पा सुलफुले यांच्या पुढाकारातून मरखेल येथे पक्षाची बैठक होऊन मरखेल व हाणेगाव परिसरातील अनेक दिग्गज शेतकरी व तरूणांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. सध्याचे सर्व प्रस्थापित पक्ष कार्यकर्त्यांना कडीपत्यासारखे वापरून घेतात, कार्यकर्त्यांना मान सन्मान देत नाहीत. परंतु प्रहार जनशक्ती पक्षात न कुणी वरिष्ठ आहे ना कुणी कनिष्ठ आहे. पक्षात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः बच्चू कडू म्हणून स्वतंत्रपणे काम करू शकतो येवढी ताकद या पक्षामध्ये असल्याचे सांगत सर्वांनी संपूर्ण देगलूर तालुका भरातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग व निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष संघटना वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्रामुख्याने भरत पाटील मरखेलकर, मारोती गवाले, वैभव पाटील मरतोळीकर, गोविंद देशमुख, राजशेखर पाटील, राजेंद्र आंदलवाड, माधव सुकनाळे, श्रीकांत मोखेडे, तहसीन अत्तार, संदिप कल्पे, पत्रकार दादाराव बेळीकर, सद्दाम दावणगिरकर, गुरूदास गवळी, एकनाथ गवाले यांच्यासह शेतकरी व तरूणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्याहवामान