• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


नवलच ! ९९.३४% असूनही औरंगाबादचा सर्वाधिक कमी निकाल

आज महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा१२ वी निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.राज्यात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के तर ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. ९१, ४३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक...आज महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा१२ वी निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.राज्यात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के तर ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. ९१, ४३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच १३७२ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. ६६८७१ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६६८६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.३१ टक्के लागला आहे.यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९९.८१ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९९.५४ टक्के लागला आहे. विज्ञान – ९९.४५ टक्के, कला – ९९.८३ टक्के, वाणिज्य ९९.८१ टक्के, एमसीव्हीसी – ९८. ८ टक्के, विभागवार निकालाची टक्केवारी १) कोकण : ९९.८१ २) मुंबई : ९९.७९ ३) पुणे : ९९.७५ ४) कोल्हापूर : ९९.६७ ५) लातूर : ९९.६५ ६) नागपूर : ९९.६२ ७) नाशिक : ९९.६१ ८) अमरावती : ९९.३७ ९) औरंगाबाद : ९९.३४ कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ९९.३४ टक्के लागलेला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान